Document Required : पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी
महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता पुढील प्रमाणे कागदपतत्रे आवश्यक आहेतः
महाराष्ट्र राज्य पुणे / नाशिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यानी पुढील कागदपत्रे सादर करावीत.
- १) काळ्या बॉल पेनने अचुक माहिती भरलेला छापील नमुनाचा प्रवेश अर्ज.
- २) रॅगींग न करण्यासंबंधीचे हमीपत्र (विद्यार्थी व पालकाचे)
- ३) पासपोर्ट आकाराचे नवीन काढलेले तीन रंगीत फोटो. (समोर पाहून फोटो काढावा)
- ४) दहावीच्या गुणपत्रकाची फक्त एक झेरॉक्स प्रत.
- ५) बारावीचे मूळ गुणपत्रक + तीन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.
- ६) बारावीची शाळा सोडल्याचा मूळ दाखला + तीन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.
- ७) मूळ बोनाफाईड / कॅरेक्टर सर्टिफिकेट + दोन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.
- ८) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जातीच्या दाखल्याची फक्त एक अटेस्टेड झेरॉक्स प्रत.
- ९) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची फक्त एक अटेस्टेड झेरॉक्स प्रत.
- १०) प्रवेश घेताना भरावयाची संबधित वर्गाच्या शुल्काची आवश्यक रक्कम (फी-तक्त्यानुसार)
- ११) सवलतीत प्रवेश घेणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचा अर्ज करणे अनिवार्य आहे, अन्यथा संपूर्ण फी जमा करावी लागेल.
- १२) मान्यता क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक असतील तर मेरिटनुसार प्रथम येणार्यास प्राधान्य क्रमाने प्रवेश दिला जाईल.